प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना*

*जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना होणार ३२ कोटी वितरण*

*थेट प्रक्षेपणामध्ये सहभाग नोंदवा*

*रत्नागिरी ः प्रतिनिधी*

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते १९ व्या हप्त्याच्या लाभ वितरणासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी बिहार राज्यातील भागलपूर येथे भव्य किसान सन्मान समारोह संमेलन आयोजित केले आहे. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास १,६०,००० शेतकऱ्यांना (अंदाजे रक्कम रु. ३२ कोटी) या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.*
जिल्ह्यातील सर्व नागरी सेवा केंद्रांवर हा कार्यक्रम प्रक्षेपणाची लिंकद्वारे https://pmindiawebcast.nic.in थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रु. 5 हजार लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले
शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
जिल्हयातील जवळपास १,६०,००० शेतकऱ्यांना (अंदाजे रक्कम रु.३२ कोटी) या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. पी.एम. किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दि. २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी १९ व्या हप्त्याचा लाभ वितरीत करणेसाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी बिहार राज्यातील भागलपूर येथे भव्य किसान सन्मान समारोह संमेलन आयोजित केले असून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर कृषि संशोधन केंद्र व सर्व कृषी विज्ञान केंद्रांमध्ये (KVKs) सदरहू कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी सह प्रगतीशील शेतकऱ्यांना आमंत्रित केले आहे. किसान सन्मान समारोह अधिक प्रभावी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर विविध योजनांची माहिती व योजनांअंतर्गत देय लाभ वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्तरावर तसेच सर्व नागरी सुविधा केंद्रांवर (CSC) त्या दिवशी अग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी नोंदणीची प्रक्रिया कार्यक्रमाच्या स्थळी राबविण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने कृषि विषयक योजनांची
माहिती प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!