*कोंकण एक्सप्रेस*
*निखिल कन्ट्रॅक्शची सामाजिक बांधिलकी*
*तोंडवली-बावशीतील प्राथमिक शाळांना सीएसआर फंडातून संगणक वाटप, मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मिळाले संगणक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देवगड निपाणी या राष्ट्रीय महामागार्थी ठेकेदार कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासत विविध समाज हिताचे उपक्रम हाती घेतले आहेत, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार कणकवली तालुक्यातील प्राथमिक शाळांना निखिल कॉन्ट्रॅक्शन ग्रुप प्रा. ली. पुणे यांच्या सीएसआर फंडातून तोंडवली व बावशी येथील प्राथमिक शाळांना संगणक वाटप करण्यात आले आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरय, उपसरपंच दिनेश कोडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, कंपनीचे अॅड. स्वप्नील जगताप, प्रशांत कांबळे, अॅड. व्यंकटेश वाडेकर, व्यवस्थापक प्रसाद शेळके, तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, केंद्रप्रमुख नारायण ओटवकर, जि. प. तोंडवली नं. १ चे मुख्याध्यापक संदीप जाधव, जि. प. शाळा तोंडवली बोभाटेवाडीचे मुख्याध्यापक मैथिली पवार, जि. प. शाळा तोंडवली गावठणचे मुख्याध्यापक महेश चव्हाण, जि. प. शाळा बावशी शेळीची वाडीचे मुख्याध्यापक उत्तम सातवसे, जि.प. शाळा बावशी नंबर १ चे मुख्याध्यापक विनोद ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर, सुप्रिया बोभाटे, कौस्तुभ नाडकर्णी, समीर मयेकर, प्रमोद ईस्वलकर, देवयानी तरल, सुरेश फेसरकर, माजी सैनिक बाबा केसरकर, मंदार गुरव, गंगाधर बोभाटे, अमित सदडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी केले आहे.