कोंकण एक्सप्रेस
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
कणकवली :प्रतिनिधि
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी राज्यभाषा गौरव दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . मराठी वाङ् मयाचे दिग्गज कवी नाटकार कादंबरीकार समिक्षक बालसाहित्यिक मानवतावादी लेखक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो . प्रशाळेत कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात मराठी विभागातील शिक्षिका सौ पी पी सावंत मॅडम यांनी प्रास्ताविक करतांना मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्या विषयी आपल्या मधूर वाणींने मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयाची अभिरूची निर्माण केली . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी मराठी वाडमयाची सविस्तर माहिती सांगून संशोधकांनी मराठी भाषेची सेवा कशी केली याचा विस्तृत आढावा घेऊन मराठी भाषेचा गौरव विद्यार्थी कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी मराठी भाषेची श्रीमंत स्थळे कोणती आहेत या विषयाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . जेष्ठ शिक्षक जनार्दन शेळके सरांनी मराठी भाषेचा गोडवा कथन करून भाषेची लिखित रूपे कोणती आहेत या विषयी मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार सौ विद्या शिरसाट मॅडम यांनी मानले .