*कोंकण एक्सप्रेस*
*’एसएम’मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली एस. एस. हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जी. एन. बोडके, आर. एल. प्रधान, जी. ए. कदम, सी.डी. हिर्लेकर, एस.एन. जोशी, एम. एस. गुरव, व्ही. डी. गायकवाड यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आरंभी मान्यवरांनी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले, जी. एन. बोडके यांनी कुसुमाग्रज यांच्या ‘काणा’ ही कविता सादर केली.
आर.एल. प्रधान यांनी कथा, कादंबऱ्या, कविता वाचन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. जी. ए. कदम यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजून सांगितले, प्रास्ताविक एम. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पायल गावकर यांनी केले, आभार कुमारी पावसकर हिने केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.