कोंकण एक्सप्रेस
उंबर्डे ग्रामस्थ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न
वैभववाडी प्रतिनिधी ता .२७ : संजय शेळके
उंबर्डे ग्रामस्थ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे रक्तदान शिबीर पार पडले. या मध्ये प्रमुख उपस्थित डॉ राजेंद्र पाताडे यांनी उंबर्डे गावाचा सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कामामध्ये असलेला सहभाग हा स्पृहनिय आहे. प्रथमच उंबर्डे गावाच्या तरुणांनी रक्तदान शिबीर आयोजित करून आपल्या पिढीला एक चांगला पायंडा घालून दिला असे गौरोउदगार काडून उंबर्डे वासियांचे कौतुक केलें. रज्जब रमदूल यांनी रक्तदाना चे महत्व आणि उपयोग उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. या वेळी व्यासपीठावर उपस्थित डॉ पाटील मॅडम, शशिकांत पवार साहेब, सदानंद दळवी, वासुदेव पावसकर,रवींद्र जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दळवी,पोलीस पाटील इमरान बोबडे, विठ्ठल पावसकर, हाजी सय्यद नाचरे, पी एच सि सर्व स्टाफ, एस एस पी एम सर्व टीम मेंबर, सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, शेखर रावराणे तसेच यू ट्यूब लाईव्ह श्री प्रशांत ढवण मान्यवर च्या उपस्थितीत होते
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ऊबडे ग्रामस्थ तरुण मंडळ कादिर फरास, किशोर दळवी, अमोल दळवी, सचिन दळवी,महेश चव्हाण, सुरेश जाधव, जावेद पाटणकर,समीर नाचरे, असिफ रमदूल, रसूल मुकादम, स्वप्नील दळवी, बबलू दळवी, करन दळवी,अल्ताफ बोबडे व सर्व रक्तदाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले…
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर दळवी यांनी केलें तर आभार प्रदर्शन कादिर फरास यांनी केलें .