कोंकण एक्सप्रेस
आंगणेवाडी जत्रेच्या शुभमुहूर्तावर तलावाच्या काठावर सीसीटीव्ही कॅमेरे
ओसरगाव तलाव परिसर सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे नियंत्रणात
कणकवली : प्रतिनिधि
आंगणेवाडी जत्रेच्या शुभमुहूर्तावर तलावाच्या काठावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आम्ही केलेल्या उपोषणांमध्ये व ग्रामस्थांची मागणी होती संपूर्ण ओसरगाव तलाव परिसर सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे नियंत्रणात आला पाहिजे त्याप्रमाणे लघुपाटबंधारे विभागाने एक पॉईंट विहिरी जवळ बसविला त्या कामाचे श्रीफळ वाढवून गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कदम लक्ष्मण तांबे विनायक अपराज रामचंद्र हडकर संजय अपराज अनिल रोडगे गावचे माजी ग्रामसेवक सीआर चव्हाण व बबली राणे उपस्थित होते त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाचे आभार व्यक्त केले त्याचे नियंत्रण कणकवली ऑफिस व आबडपाल ऑफिसला राहणार आहे चार दिवसात ते कार्यान्वित होतील.