*कोंकण एक्सप्रेस*
*राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत कोकण विभाग अजिंक्य*
*बांदा : प्रतिनिधी*
नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कोकण विभागाने खो खो खेळात विजेतेपद
पटकावले. अंतिम सामन्यात पुणे विभागाचा पराभव करत कोकण विभागाने अजिंक्यपद मिळविले. सावंतवाडी तहसीलदार तथा कर्णधार श्रीधर पाटील यांनी चमकदार कामगिरी बजावली. नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वैयक्तिक सांघिक आणि मिश्र अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोकण तसेच नोंदणी मुद्रांक व भूमि अभिलेख विभाग अशा एकूण सात विभागांमध्ये 83 क्रीडा प्रकारात लढती झाल्या. खो खो स्पर्धेत कोकण विभागाने उपांत्य पूर्व सामन्यात नाशिक विभागाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात कोकण विभागाची पजमान छत्रपती संभाजीनगर विभागाशी लढत झाली. यामध्ये कोणतेही दडपड न घेता कोकण संघाने यजमान संघाला मात देत अंतिम फेरी प्रवेश केला. दुसरीकडे दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे विभागाने नागपूर विभागाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सामन्यात कोकण विभागाने पुणे विभागाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
संपूर्ण खो खो स्पर्धेत कोकण संघाकडून कर्णधार तथा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी चमकदार कामगिरी बजावली. अंतिम सामन्यात उपकर्णधार श्रीनिवास मेतरी (रायगड) तसेच राम पावसकर, रजनीकांत नाईकवडे (सिंधुदुर्ग), निखिल पिळणकर (मुंबई शहर), शंकर पाटील (मुंबई उपनगर) आणि अमित ताथवडे (रायगड) यांनी मोलाची कामगिरी बजावली. सांस्कृतिक स्पर्धेत नाशिक विभाग प्रथम, कोंकण विभाग द्वितीय व नागपूर विभागाने तृतीय पुरस्कार मिळवला. विविध स्पर्धेत तब्बल 341 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद कोकण विभागाने पटकावले तर छत्रपती संभाजीनगर विभागाने 227 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर तर 217 गुणांवर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ङ्ग कोकण विभागाचे सर्वाधिक 341 गुण ङ्गक्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, धावणे, चालणे, जलतरण, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बॅडमिंटन, गोळा फेक, थ्रो बॉल, थाळीफेक, भालाफेक, रिंग टेनिस, संचलन अशा क्रीडा प्रकारांमध्ये पुरुष, महिला व मिश्र संघ 45 वर्षावरील संघ असे एकूण 82 क्रीडाप्रकार होते. तसेच सांस्कृतिक आयोजन अशा एकूण 83 घटकातून गुणानुक्रमांक देण्यात आले. यामध्ये कोकण विभागाने सर्वाधिक 341 गुण मिळवले तर त्या पाठोपाठ यजमान छत्रपती संभाजीनगरने 226 गुण मिळवले तर तिसऱ्या क्रमांकावर 217 गुणांवर पुणे विभाग राहिला.