सुप्रसिध्द काशी विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्रीदिनी भाविकांची अलोट गर्दी

सुप्रसिध्द काशी विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्रीदिनी भाविकांची अलोट गर्दी

*कोंकण प्रतिनिधी*

*सुप्रसिध्द काशी विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्रीदिनी भाविकांची अलोट गर्दी*

*रत्नागिरी*

रत्नागिरीतील राजीवडा येथील सुप्रसिध्द काशी विश्वेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात व अमाप उत्साहात संपन्न झाला. भगवान शंकराच्या दर्शनासाठी या मंदिरात सकाळपासूनच भाविकांची रांग लागली होती. मंदिरात महाशिवरात्री निमित्त महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थानच्या विश्वस्तांनी व कार्यकर्त्यांनी उत्सवाची जय्यत तयारी केली होती तसेच उत्तम व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे कोणताही गडबड गोंधळ न होता सर्व भाविकांना शांतचित्ताने मनाजोगे दर्शन घेता आले. त्याबद्दल सर्व भाविकांनी देवस्थानच्या विश्वस्तांना व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!