*कोंकण एक्सप्रेस**
*गोपुरी आश्रम येथे उद्या मराठी भाषा गौरव दिन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कणकवली व गोपुरी आश्रम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. गोपुरी आश्रम येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कोमसापचे अध्यक्ष माधव कदम यांनी दिली. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, कार्यक्रम समिती सदस्य व निमंत्रित सदस्य यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

