*कोकण Express*
*सावंतवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रवीण मांजरेकर यांची निवड*
*सचिवपदी प्रसन्न राणे, खजिनदारपदी रामचंद्र कुडाळकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची निवडणूक आज पर पडली असून, या निवडणुकीत दैनिक तरुण भारतचे उपसंपादक प्रविण मांजरेकर आणि दैनिक पुढारीचे पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्यात अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत २८ विरूद्ध १४ अशा फरकाने प्रविण मांजरेकर यांनी विजय मिळवला असून, तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.
तसेच सचिव पदी दैनिक सकाळचे उपसंपादक प्रसन्न राणे, खजिनदार पदी रामचंद्र कुडाळकर, तालुका उपाध्यक्ष पदी महादेव उर्फ काका भिसे व उत्तम नाईक तर शहर सचिव पदी मंगल कामंत याची बिनविरोध निवड झाली आहे.