*कोंकण एक्सप्रेस*
*अरुणा धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील रस्ता रुंदीकरण करून संरक्षक भिंत बांधण्यात यावी…*
*मौदे गावचे माजी सरपंच अनंत कांबळे यांची मागणी*
*वैभववाडी ः संजय शेळके*
हेत मौदे दरम्यान अरुणा धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असून यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून संरक्षक भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी मौदे गावचे माजी सरपंच अनंत कांबळे यांनी केली आहे.
अरुणा धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरून भोम, मौदे, आखवणे गुरववाडीकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याने सध्या या गावातील दळणवळण चालू आहे. मात्र हेत ते भोम दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असून नागमोडी वळणे आहेत. यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. अशा ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून आवश्यक त्याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केले आहे.