*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून एकूण नऊ संगणक पंचायत समिती कार्यालयाला सुपूर्त*
*सावंतवाडी : प्रतिनिधी *
माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून आज चार संगणक सावंतवाडी पंचायत समितीला सुपूर्त करण्यात आले हे संगणक शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी वेळोवेळी पंचायत समितीला सहकार्य केले असून माजी सभापती अशोक दळवी तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी वेळोवेळी पंचायत समितीच्या विविध कामांमध्ये सहकार्य केले त्याचबरोबर पंचायत समितीला यापूर्वी पाच आणि आता चार असे एकूण नऊ संगणक प्रदान केल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी जिल्हात प्रमुख आणि माजी सभापती अशोक दळवी यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त निधी आणि विकास पोहोचावा यासाठी आमदार दीपक केसरकर सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यातही अशा प्रकारे लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले
पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी संदेश सोनुर्लेकर विनोद सावंत जगदेव गवस संदीप राणे एकनाथ हळदणकर बापू कोठावळे मायकल डिसूझा सावंतवाडी पंचायत समितीचे अधिकारी विनायक पिंगुळकर जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.