*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड-वळीवंडे येथे उ.बा.ठा शिवसेनेच्या जन संपर्क कार्यलयाचा शुभारंभ*
*माजी खासदार-शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते झाले उद्धाटन*
*माजी खासदर विनायक राऊत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती*
*देवगड : प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील वळीवंडे गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “जन संपर्क कार्यालयाचा” शुभारंभ शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते फीत कापून संपन्न झाला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जन संपर्क कार्यालयाचा शुभारंभ पार पडला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वळीवंडे शाखेच्या वतीने विनायक राऊत व सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. खासदार विनायक राऊत म्हणाले, कोणी कितीही शिवसेना संपवण्याचा प्रयन्त केला तरी शिवसेना संपणार नाही. शिवसेनेचा माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करतच राहू, कोकणातील शिवसैनिक हा एक सच्चा कटवट शिवसैनिक आहे. पुन्हा त्याच ताकदीने शिवसेना पक्ष सिंधुदुर्गात कार्यरत राहील.
यावेळी देवगड तालुका प्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, उपतालुका प्रमुख विष्णू सावंत, बापू सावंत, विभागप्रमुख मंगेश फाटक, शाखाप्रमुख गौरव तांबट, विक्रांत नाईक, सचिन पवार, सुधा सावंत, सुहास पवार, प्रतीक्षा साटम, विनिता सावंत, ममता घाडी, जनार्धन घाडी, सत्यवान वळंजू, कृष्णा घाडी, रेश्मा सावंत, मनोहर वळंजू, शरद लोके, दीपक किंजवडेकर, प्रकाश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.