*कोंकण एक्सप्रेस*
*शेतकऱ्यांना त्वरित मदत करा : बाबुराव धुरी*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
तालुक्यात घोटगे गांवात आज अवकाळी पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान केले, साधारण 45 हजार केली जमीनदोस्त झाल्या असून 70 लाख रुपयाचे प्रथम दर्शनी नुकसान झाल्याचे दिसत आहे, यात घोटगे गावातील केळी बागायतदार पूर्णतः हतबल झाला असून आता पुढे काय करायचे हा प्रश्न या शेतकऱ्यां पुढे आहे, याची दखल संबंधित कृषी विभागाने घेऊन त्वरित पंचनामे करावें तसेच यातील काही अंशी रक्कम या शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे.
घोटगे गावातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने आपण कायम असून या शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करु, या शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून मदत द्या असे श्री.धुरी यांनी प्रसिद्धीदिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

