मालवणात राष्ट्र विरोधी घोषणा

मालवणात राष्ट्र विरोधी घोषणा

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणात राष्ट्र विरोधी घोषणा*

*भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच निकालानंतर घडला प्रकार*

*परप्रांतीय भंगार व्यवसायिकाला संतप्त नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात*

*एका पुरुषासह एक महिला व एका अल्पवीन मुलाचा समावेश*

*मालवण पोलिसांची माहिती हिंदू समाज संतप्त*

*मालवण : प्रतिनिधी*

विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी संबंधितांना विचारणा केली असता त्यां संबंधितांकडून अरेरावी करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यां प्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती एकाला अटक करण्यात आली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्या कायद्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तर एका महिलेचीही चौकशी सुरु असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

हिंदू समाज आक्रमक

भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये भारत विजयी झाल्यानंतर मालवण मधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मालवणातील सर्व हिंदू युवकांनी या देशद्रोहीना पोलिसांच्या स्वाधीन केले. मागील काही महिन्यात देशविरोधी कारवाई बाबत संबंधितांची सखोल चौकशी व्हावी. भंगारवाले, भाजीवाले व बाहेरील आलेले मुस्लिम व्यवसायिक यांची पूर्ण चौकशी करावी व यांचे आधार कार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची शहानिशा करावी या मागणीसाठी आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता, मालवण देऊळवाडा पुलावरून मोटरसायकल रॅलीने मालवण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत आवाहन मालवण सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. हिंदू एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!