*कोकण Express*
*महसूल विभागाने जप्त केलेला डंपर पळवला ; तहसिल कार्यालय परिसरातील घटना*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक प्रकरणी काही दिवसांपूर्वी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई केलेल्या चार डंपर पैकी एक डंपर रात्री संबंधित डंपर चालकाने पळविल्याचे निदर्शनास आले आहे. सावंतवाडी तहसिलदार कार्यलयाच्या आवारात हे डंपर उभे करून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, कारवाई केलेला डंपर पळविण्याच्या घडलेल्या या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यानी या घटनेला दुजोरा दिला असून, संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.