मालवणात २५, २६ फेब्रुवारीला मधुमेह तपासणी व औषध वाटप शिबीर

मालवणात २५, २६ फेब्रुवारीला मधुमेह तपासणी व औषध वाटप शिबीर

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणात २५, २६ फेब्रुवारीला मधुमेह तपासणी व औषध वाटप शिबीर*

*लायन्स क्लब मालवण आणि उद्योजक सागर वाडकर यांच्यावतीने आयोजन; पुणे येथील प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टर ए. एच. इनामदार करणार तपासणी*

*मालवण : प्रतिनिधी*

लायन्स क्लब मालवण आणि पुणे येथील प्रख्यात उद्योजक सागर वाडकर यांच्या विद्यमाने दैवज्ञ भवन मालवण येथे २५ व २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मधुमेह तपासणी व औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. ए. एच. इनामदार हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.

या शिबिराला प्रथम येणाऱ्या २५ गरजूना मोफत औषधे दिली जातील. गरजू व्यक्तींनी नाव नोंदणीसाठी सौ. पल्लवी तारी -खानोलकर 9011056317, गणेश प्रभुलीकर- 9422584649, फॅनी फर्नांडिस 7066737436 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लायन्स क्लब मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!