कोंकण एक्स्प्रेस
विलवडेत शासन मान्य रेशन दुकानाचा उत्साहात शुभारंभ…
सावंतवाडी ता. २३: प्रतिनिधि
ओटवणे सोसायटीच्या माध्यमातून विलवडेत शासन मान्य रेशन दुकानाचा सरपंच प्रकाश दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी वि.वि.ध सेवा सोसायटीचे चेअरमन दाजी गावकर, व्हा चेअरमन स्वप्नील उपरकर, माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस रर्वीद्र म्हापसेकर, शेखर गावकर सोनू दळवी, बाळकृष्ण दळवी, कृष्ण दळवी, प्रदीप दळवी, रवींद्र गावकर, रेशन ग्राहक आदी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे विलवडे गावातील लोकांना धान्यसाठी वाफोली येथे सुमारे ५ किलोमीटर जावे लागत होते. आता ती परवड संपली असून विलवडे गावतच ओटवणे सोसायटीने धान्य दुकान सुरु केले आहे. त्यामुळे विलवडे वासियांना समाधान व्यक्त केले आहे.