*कोंकण एक्सप्रेस*
*मणेरी येथे दुचाकी व कार अपघात, युवक गंभीर जखमी*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वेंगुर्ला येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान जखमीला तात्काळ तेथील ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.