संजू परबांचा भाजपला दणका, कोलगावातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत

संजू परबांचा भाजपला दणका, कोलगावातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत

*कोंकण एक्सप्रेस*

*संजू परबांचा भाजपला दणका, कोलगावातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत…*

*आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघ बांधणार ; संजू परब*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे युवा नेते संजू परब यांनी आज कोलगाव पंचायत समिती मतदार संघातील भाजपसह ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांच्या या राजकिय रणनितीमुळे भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांना धक्का बसणार आहे. दरम्यान ये तो शुरूवात है…!! आज पासून मतदार संघात प्रवेशाचा धडाका लावणार असून आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या आदेशानुसार संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सुरूवात केली आहे, असे ते म्हणाले.

कोलगाव पंचायत समिती मतदार संघातील भाजपाच्या कार्यकत्यांसह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज श्री. परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. आम्हाला आमच्या मतदार संघाच्या विकासासाठी संजू परब यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी संजू परब यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज पासून कोलगाव मतदारसंघापासून आम्ही पक्षप्रवेश घेण्यास सुरुवात केली. आता सावंतवाडी मतदारसंघात आम्ही प्रवेश घेणार आहोत. येणाऱ्या काळात संघटना मजबूत झालेली दिसेल, असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला.

यावेळी लक्ष्मण सावंत, सखाराम करमळकर, निखिल सावंत, शशिकांत करमळकर, किशोर न्हावी, नितीन सावंत, विश्राम न्हावी, योगिता करमळकर, लक्ष्मण वडार, राम वडार, सुरेश वडार, दिलेश जाधव, शोभराज जाधव, विकास जाधव, रवी पवार, विजय चव्हाण, राकेश पवार, अॅड. विवेक टोपले, फिरोज शेख, नारायण निर्घण, रेश्मा करोल, खयरूनिसा खान, रोशनदी शेख, शाहीन शेख, लक्ष्मण सावंत, सखाराम करमळकर, निखिल सावंत, शशिकांत करमळकर, किशोर न्हावी, नितीन सावंत, विश्राम न्हावी, योगिता करमळकर, लक्ष्मण वडार, राम वडार, सुरेश वडार आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!