*कोकण Express*
*खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च सेवाभावी कार्यक्रम…!*
*तालुक्यातील १२७ आशासेविकांचा सत्कार…!*
*१५ मार्च रोजी सायंकाळी केक कापून साजरा होणार वाढदिवस…!*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांची माहिती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर, कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरगच्च सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली तालुक्यातील १२७ आशासेविकांचा सत्कार भगवती मंगल कार्यालयात १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी केक कापून खासदार राऊत यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने 5 हजार मास्क चे मोफत वाटप कणकवली वासीयांना केले जाणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू उपस्थित राहणार आहेत.
बॅ. नाथ पै,मधु दंडवते यांची समाजसेवेची यशस्वी परंपरा खासदार राऊत चालवत आहेत. दांडगा लोकसंपर्क असलेल्या खासदार राऊत यांच्यावर दिल्ली मध्ये शिवसेनेचे संसद गटनेते, महाराष्ट्र शिवसेना सचिव पदी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार असलेल्या खासदार राऊत यांचे तळकोकणातील शिवसेनेच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. कणकवली प्रमाणेच देवगड तालुक्यातील आशासेविकांचाही खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त १८ मार्च रोजी सत्कार करण्यात येणार आहे.
युवा सेनेच्या वतीने कणकवली शहरासह लगतच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत मास्क आणि फळवाटप करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, हर्षद गावडे, राजू राठोड, खारेपाटण विभागप्रमुख गोट्या कोळसुलकर, नगरसेवक कन्हैया पारकर, शहरप्रमुख शेखर राणे आदी उपस्थित होते.