आंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ

आंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*आंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ*

*लाखो भाविक श्री भराडी देवी चरणी नतमस्तक*

*मालवण : प्रतिनिधी*

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवास अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात लाखो भावीक भेट देत असल्याने आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव हा दक्षिण कोकणात महत्त्वपूर्ण मानला जातो. पहाटेपासूनच श्रीदेवी भराडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावर्षी दहा रांगांमधून भाविकांना श्रीदेवी भराडीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री देवी भराडीचे दर्शन सुलभरीत्या व्हावे यासाठी आंगणे कुटूंबीय, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ त्याचप्रमाणे प्रशासनाने सुरेख असे नियोजन केल्याने भाविकांना लवकरात लवकर देवीचे दर्शन होत होते. सकाळपासून सुरू झालेल्या या यात्रेतून लाखो भाविकांनी श्रीदेवी भराडीचे दर्शन घेत नवस बोलले आणि फेडले. तुलाभार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. आज सकाळी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विद्यमान मंत्री नितेश राणे, खासदार अरविंद सावन्त त्याचप्रमाणे मनसे नेते शिरीष सावंत तसेच आमदार खासदार यांनीही यात्रोत्सवाला भेट देत श्रीदेवीचे दर्शन घेतले. भराडी मातेच्या दर्शनासाठी विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही आंगणेवाडीत ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!