*कोंकण एक्सप्रेस*
*कलंबिस्त येथे २५ फेब्रुवारीला आरोग्य तपासणी शिबीर*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. व ग्रामपंचायत कलंबिस्त, कलंबिस्त हायस्कूल व विजय क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर २५ फेब्रुवारी रोजी कलंबिस्त हायस्कूल येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषधोपचार केला जाणार आहे.
दोन सत्रात हे शिबीर होणार असून सकाळच्या सत्रात तपासणी, दुपारी दोन वाजल्यानंतर पंचकर्म व योगासंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी डॉ. जे. एस. यादव, डॉ. दत्तकुमार कोराडे, डॉ. प्रथमेश शि. पई, डॉ. प्रथा पई, डॉ. कांचन विरनोडकर रुग्णांची तपासणी करणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अॅड. संतोष सावंत, संजू विरनोडकर, संतोष तळवणेकर, सरपंच सपना सावंत व मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदींनी केले आहे.