*कोंकण एक्सप्रेस*
*महाशिवरात्रीनिमित्त भव्य ‘मोबाईल रिल्स’ स्पर्धा*
*आंबोली हिरण्यकेशी येथील महाशिवरात्री सोहळ्याची रील बनवणे गरजेचे*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री.दिनेश शिवाजी गावडे यांच्याकडून आंबोली हिरण्यकेशी येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य मोबाईल रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.हि रिल्स स्पर्धा दि.२६ फेब्रुवारी रोजी आंबोलीतील हिरण्यकेशी ठिकाणी असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१/- , द्वितीय पारितोषिक ३००१/-, तृतीय पारितोषिक १००१/- असे बक्षीस ठेवण्यात आले आहे,
स्पर्धेकांनी HD स्वरुपातील रिल्स २०२५ या चालू वर्षाच्या आंबोली येथील ‘हिरण्यकेशी महाशिवरात्री’ सोहळ्यातील असावी @dineshgawade858 या इंस्टाग्राम पेजला फाॅलो करुन Collaboration करणे आवश्यक आहे.तसेचं रिल्स च्या सुरुवातीला आयोजकांनी दिलेला एक फोटो जोडणे आवश्यक आहे.आपली रील २८ फेब्रुवारी पर्यंत अपलोड करने गरजेचे आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी ७५८८७१०३३५ या मोबाईल नंबर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.