होळी उत्सवासाठी दोन विशेष गाड्या

होळी उत्सवासाठी दोन विशेष गाड्या

*कोंकण एक्सप्रेस*

*होळी उत्सवासाठी दोन विशेष गाड्या*

*कणकवली : प्रतिनिधी*

होळी उत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी व लोकमान्य टिळक (टी)-मडगाव जंक्शन-लोकमान्य टिळक (टी) या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी (०११५२) व मडगाव जंक्शन-लोकमान्य टिळक (टी) (०११३०) या गाड्यांचे बूकिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (०११५१) ही विशेष गाडी गुरुवार, ६ आणि १३ मार्च रोजी मुंबई सीएसएमटीहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटुन त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी (०११५२) ही विशेष गाडी गुरुवार, ६ आणि १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता मडगाव जंक्शनहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकावर थांबेल.

लोकमान्य टिळक (टी)-मडगाव जंक्शन (०११२९) ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार १३ आणि २० मार्च रोजी रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. मडगाव जंक्शन- लोकमान्य टिळक (टी) (०११३०) ही विशेष गाडी शुक्रवार १४ आणि २१ मार्च रोजी दुपारी २.४० वाजता मडगाव जंक्शनवरून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!