*कोंकण एक्सप्रेस*
*नावळे राणेवाडी स्मशान शेडचे भूमिपूजन*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अबिद जी नाईक साहेब यांच्या माध्यमातुन जन सुविधा अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नावळे राणेवाडी शमशान शेडचा भूमिपूजन समारंभ कऱण्यात आला. सदर काम मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य अबिद नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, नावळे गावच्या सरपंच सोनल गुरव, उपसरपंच संजय रावराणे,जमीन मालक शशी रावराणे,अंकित सावंत,ग्रामसेवक अनिल घुगे,भिकाजी सुतार, सूर्यकांत सावंत, बाळा सुतार,विजय सावंत, ज्ञानेश्वर सुतार, जघनाथ गुरव,मोहन लसने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.