*कोंकण एक्सप्रेस*
*ग्रा.पं.सदस्य श्री.धीरज श्रीधर मेस्त्री यांच्या मागणीला यश*
*MSEB ने घेतली तात्काळ दखल : कलमठ बाजारपेठ येथील ट्रान्सफॉर्मरच्या कामाला वेग*
*कणकवली : प्रतिनिधी*
कलमठ बाजारपेठ पारस हॉटेल आणि फोंडेकर कंपौंड समोर असलेले विद्युत वायर कमी अंतरावर असल्या कारणामुळे वारंवार रात्री जाणार्या मोठ्या अवजड वाहनांना वायर लागून नेहमी वीज पुरवठा खंडित होत होता.
काही दिवसापुर्वी ही बाब महावितरण अधिकारी, कलमठ ग्रामीण 2, शाखा कणकवली विभाग यांच्या निदर्शनास आणून देऊन तातडीने हे काम करून घ्या अशी विनंती धीरज मेस्त्री (ग्रामपंचायत सदस्य,कलमठ) व उपस्थित ग्रामस्थांनी केली होती .त्याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) ने त्या कामाला सुरुवात केली असून यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच अतिरिक्त वाढत्या विद्युत भारामुळे झालेल्या नुकसानीचा चा देखील पाठपुरावा अधिकाऱ्यांकडे होत आहे.