दूध उत्पादक शेतकऱ्यांना थकविणाऱ्या उमेदवारांना हद्दपार करा – गुरूदास गवंडे

दूध उत्पादक शेतकऱ्यांना थकविणाऱ्या उमेदवारांना हद्दपार करा – गुरूदास गवंडे

*कोकण Express*

*दूध उत्पादक शेतकऱ्यांना थकविणाऱ्या उमेदवारांना हद्दपार करा – गुरूदास गवंडे*

*पशुधन घटण्यास अधिकारी, लोकप्रतिनिधीच जबाबदार*

*बांदा ः प्रतिनिधी*

आगामी काळातील जिल्हा बँकेच्या निवडणुका समोर ठेवून दुध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्याचा दुध उत्पादक संघ असताना बाहेरील दुध डेरी जिल्ह्यात आणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. जिल्ह्यात अशा दुध संघांना आणण्यासाठी सहाय्य करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहतील अशांना या निवडणुकीतून शेतकऱ्यांनी हद्दपार करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गुरूदास गवंडे यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे ते म्हणाले की, इन्सुली सारख्या गावामध्ये कोट्यवधींची इमारत बांधून त्या ठिकाणी जर पशुवैद्यकिय अधिकारी नसतील तर अशी इमारत बांधून तरी उपयोग काय असा सवाल गुरूदास गवंडे यांनी केला आहे. शासनाचा कोट्यवधीचा निधी याठिकाणी खर्च केला जातो. कागदावर आकडे दाखविले जातात, परंतु प्रत्यक्ष मात्र कृती नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील पशुधन घट झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त असलेले पशुवैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, औषधे, गायी-म्हैसीना लागणारे खाद्य जर उपलब्ध झाले तर पशुधन घट होऊच शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करावा, असे आवाहन गवंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!