*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ वाचनालयात २७ फेब्रुवारीला पुस्तक प्रदर्शन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
‘२७ फेब्रुवारी’ हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० .०० वाजता वाचनालयाने नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीपासून वाचकांना ही पुस्तके वाचायला दिली जाणार आहेत. प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.