शिवजयंती उत्सव समिती,कलमठच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी

शिवजयंती उत्सव समिती,कलमठच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवजयंती उत्सव समिती,कलमठच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी*

*कणकवली : प्रतिनिधी*

दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव समिती,कलमठ
च्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने सकाळी SSS योद्धा १+पथक,बिडवाडी यांनी शिवकालीन मर्दानी खेळ सादर केले यात लाठीकाठी,तलवारी बाजी,
दांडपट्टा,भाला आणि पाश यांची प्रात्यक्षिके सादर करून पथकातील सर्व कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरी साठी बहिर्जी नाईक वापरत असलेली *करपल्लवी भाषेच* प्रात्यक्षिक सुद्धा यावेळी दाखवण्यात आले.

त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा दोन गटामध्ये पार पडल्या.त्यामधे*इयत्ता १ली ते ४ थी गटामध्ये*प्रथम क्रमांक – हेरंब जयराम राऊळ(एस एम हायस्कूल, कणकवली),द्वितीय क्रमांक- अखिलेश विजय घोरपडे.(एस एम हायस्कूल, कणकवली),तृतीय क्रमांक – पार्थ गणेश मोडक.(शाळा कलमठ बाजारपेठ क्र.१) यांनी पटकावला तर *इयत्ता ५ वी ते ८ वी गटामध्ये*प्रथम क्रमांक – आयुष बागवे,द्वितीय क्रमांक – संतोषी सुशांत आळवे(विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली),तृतीय क्रमांक – तेजस्विनी रमाकांत देवलकर.(एस एम हायस्कूल, कणकवली) यांनी प्राप्त केला.

*बुद्धिबळ स्पर्धा (१५ वर्षा खालील)*मध्ये प्रथम क्रमांक – रुद्रांश प्रमोद राय,द्वितीय क्रमांक – यश संदेश पवार,तृतीय क्रमांक – मुग्धा विकास साईल/ गौरेश श्रेयस तायशेट्ये.*जोर मारणे*मध्ये प्रथम क्रमांक – अखिलेश संतोष राणे(सरवंजे Fitness Center, फोंडा),द्वितीय क्रमांक – शुभम धनंजय हळदिवे(सरवंजे Fitness Center, फोंडा),तृतीय क्रमांक – संदीप अशोक परब(Srk’s Fitness Center,कलमठ),उत्तेजनार्थ १- अमोल अनंत तेली(सरवंजे Fitness Center, फोंडा),उत्तेजनार्थ २ – मनोज कृष्णा गावकर(Srk’s Fitness Center,कलमठ).

*बैठका मारणे*प्रथम क्रमांक – शुभम धनंजय हळदिवे(सरवंजे Fitness Center, फोंडा),द्वितीय क्रमांक – ओंकार हनुमंत लाड
(Srk’s Fitness Center,कलमठ),तृतीय क्रमांक – सिद्धेश सुरेश गुरव(Srk’s Fitness Center,कलमठ),उत्तेजनार्थ १ – दीप नंदकुमार भोगले(सरवंजे Fitness Center, फोंडा)
उत्तेजनार्थ २ – विश्वराज विजय सातपुते(Srk’s Fitness Center,कलमठ)अश्या विविध स्पर्धेत स्पर्धकांना यश मिळाले.

या शिवजयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुशांत राऊळ,पी. व्ही. कांबळे गुरुजी,नितीन पेडणेकर,आबा(नितीन) मेस्त्री,अनुप वारंग,धीरज मेस्त्री,नितेश भोगले,प्रदीप सावंत,सिकंदर मेस्त्री,सागर गावडे,सुंदर कोरगावकर,निश्चय हुन्नरे कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज याना श्री सुनील नाडकर्णी आणि डॉ. स्वप्निल राणे यांच्या हस्ते महाराजांना हार अर्पण करून केली.

तसेच या कार्यक्रमासाठी अर्जुन राणे,अनंत हजारे, तनोज कळसूलकर,दिनेश लाड,गिरीश धुमाळे,विनय खोचरे, अण्णा मठकर, विनोद कोरगावकर,संजय खोचरे, नीलेश महेंद्रकर, संदीप कांबळी, बाळू मेस्त्री, श्रीकांत बुचडे, किरण हुन्नरे, विलास गुडेकर,महेश लाड, हरी रावराणे,बंडू (राजाराम)दंताळ
आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य – श्रीकांत बुचडे सर,नीलेश महेंद्रकर सर,सुंदर कोरगावकर सर,मालंडकर सर, संदेश पवार सर, मंदार परब, विनय खोचरे, दिनेश लाड, विठ्ठल गावडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!