*कोकण Express*
*भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरवडे वासीयांना दिलेला शब्द केला पूर्ण..*
*वरवडेत पायवाटेसह, रस्ता खडीकरण डांबरीकरण चे भूमिपूजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरवडे वासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला. वरवडे श्री देव पायकांडा ते श्री देव लिंगेश्वर मंदिर ( लिंगाची भाटी ) या पायवाटेचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सरपंच बांदल यांच्या हस्ते, तर मुकुंद परब यांच्या घरी जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले.
आमदार नितेश राणे यांनी या पायवाटेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द वरवडे वासीयांना दिला होता.मात्र कोरोनामुळे या पायवाटेचे काम प्रलंबित राहिले होते. विकासनिधी प्राप्त होताच प्रथम माझ्या गावच्या वडीलधाऱ्यांची मागणी पूर्ण केली आहे. यापुढेही माझ्या वरवडे गावातील ग्रामस्थांच्या विकासात्मक कामांची मागणी नेहमीच पूर्ण करेन अशी ग्वाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली. यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, सरपंच बांदल, मधुकर परब, चंद्रकांत परब, शिवराम परब, अशोक परब, भारती हेगडे, सुनील परब, हेमंत परब, प्रभाकर परब, सादिक कुडाळकर, विजय कदम, दशरथ घाडीगांवकर, प्रकाश परब, प्रमोद गावडे.