कनकसिंधू शहर स्तर संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

कनकसिंधू शहर स्तर संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*कनकसिंधू शहर स्तर संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी*

*कणकवली : प्रतिनिधी*

नगरपंचायत, DAYNULM अंतर्गत स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवली यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थित साजरी करण्यात आली. मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा व आरती करण्यात आली.

यावेळी कणकवली नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, मनोज धुमाळे, प्रशांत राणे, संदीप मुसळे, ध्वजा उचले, रुचिता ताम्हणकर, वर्षा कांबळे, सुमित कुबल तळेकर मॅडम , कनकसिंधू शहर स्तर संघचे अध्यक्ष श्रीम.प्रिया सरुडकर, उपाध्यक्ष श्रीम. रंजिता परब, सचिव श्रीम. शुभांगी उबाळे, सहसचिव श्रीम. विशाखा कांबळे, खजिनदार श्रीम. दिव्या साळगावकर, सदस्य- श्रीम, सुचिता पालव, श्रीम.स्वाती राणे, श्रीम ईशा कांबळे , श्रीम. स्वाती गोखले, श्रीम.मयुरी सरंगले, श्रीम. ज्योती रावराणे, श्रीम.नीलम कोरगावकर, तसेच इतर पदाधिकारी व बचतगट सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

यानंतर उपस्थित बचत गट सदस्य यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये सुवर्णा कांबळे, रीना जोगळे, ऋतुजा सावंत, दिपाली जावडेकर, सुचिता सोनी, शालेय विद्यार्थिनी गुंजन शिंगाडे यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. त्यानंतर युगा दळवी हिने नृत्य व अनुजा गावडे यांनी शिवगर्जना सादर केली. माऊली ALF कडून एक पात्री नाटक,सविता सुतार व इतरांनी शिवाजी महाराजांची विविध गाणी सादर केली. तसेच या कार्यक्रमाला मयुरी सरंगले यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा खास आकर्षण राहिले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, सूत्रसंचालन CLC व्यवस्थापक सिद्धी नलावडे यांनी तर आभार अध्यक्ष प्रिया सरुडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!