*कोंकण एक्सप्रेस*
*शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव – धाकोरे च्या वतीने आजगांव येथे 23 फेब्रुवारीला भव्य रक्तदान शिबीर*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव – धाकोरेच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आजगांव नं 1येथे माघ कृष्ण दशमी शके 1946 रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025रोजी सकाळी 07.00 वाजता ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत भव्य – दिव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.तरी सर्व रक्तदात्यांनी व ग्रामस्थांनी या रक्तदान शिबीरचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळ आजगांव – धाकोरे व ग्रामस्थ यांनी केले.