विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे चरित्र विद्यार्थासमोर उलगडून दाखविले १८३२ साली दर्पण वृत्तपत्राचे आद्यप्रवर्तक बाळशास्री जांभेकर कोकण भूमित जन्मले अफाट प्रतिभाशक्तीच्या जोरावर वृत्तपत्र सृष्टीत मानांचेस्थान प्राप्त करून पारतंत्र्याच्या काळात इंग्रजाच्या कुटील कारस्थानांचा प्रखर समाचार दर्पण वृत्तपत्रातून घेऊन भारतीय स्वातंत्र्याची बिजे भारत भूमित पेरणारे विचारवंत सुधारक म्हणून बाळशास्री जांभेकरांचे कार्य अतुलनिय आहे वृत्तपत्रविद्या या शाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आद्यपत्रकार बाळशास्त्रींचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल केली तरच भारताची विकसित रूपे सहज उलगडली जातील अशा शब्दांत श्री कांबळे सरांनी बाळशास्री जांभेकरांची आठवण करून दिली पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी आजची पत्रकारीता आणि बाळशास्त्री जांभेकरांचे जीवन या विषयी मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री राजेश सिंगनाथ सरांनी सुत्र संचालन करून बाळशास्त्रीचे जीवन चरित्र ओघवत्या शैलीत उलगडून दाखविले आभार श्री संदिप वामन नागभिडभर सरांनी मानले यावेळी विद्यार्थी ‘ शिक्षक ‘ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!