*कोंकण एक्सप्रेस*
*आईच्या संस्कारामुळे छत्रपती घडले : प्रकाश पारकर*
*कासार्डे-तांबळवाडी शाळा वार्षिक स्नेहसंमेलनात प्रतिपादन*
*कासार्डे : संजय भोसले*
ज्या शाळेचे पालक आणि शिक्षक दोन्ही उपक्रमशील व आदर्श असतात, ती शाळाही आदर्श होते.मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसोबत पालकांची भूमिकाही महत्वाची असते असे विचार माजी पं.स उपसभापती प्रकाश पारकर यांनी व्यक्त केले.
जि. प. प्राथ. शाळा कासार्डे-तांबळवाडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रकाश पारकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे ,उपसरपंच गणेश पाताडे,सोसायटी चेअरमन दिपक सावंत,ग्रा.प सदस्य अभिजित धुमाळ,श्रद्धा शेलार,तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्रीरंग पाताडे, पोलीस पाटील महेंद्र देवरूखकर,महेश आयरे,प्रथमेश पारकर,अक्षय चव्हाण, स्वाती पाताडे, माजी सैनिक रवींद्र पाताडे,चंद्रकांत पाताडे,रणदीप गायकवाड, जगदीश गोसावी, विनायक जाधव,सत्यवान केसरकर,गुरुप्रसाद पाटील, जाकीर शेख,श्रीराम विभूते,प्रवीण ठाकूर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुनाथ पाताडे,उपाध्यक्ष रेश्मा साईम आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.मुख्याध्यापक निलेश ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
प्रकाश पारकर,संजय पाताडे,निशा नकाशे ,श्रीराम विभूते यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीमध्ये ग्रामस्थांच्या सहभागाबद्दल सर्वांचे आभार निलेश पाताडे यांनी मानले. सूत्रसंचलन विनायक पाताडे व निकिता ठाकूर यांनी केले. शाळेतील विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, ज्ञानी मी होणार व दहावी,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.