*कोंकण एक्सप्रेस*
*पुण्यातील बारामतीत तरुणीचा जीबीएस आजाराने मृत्यू*
*पुणे*
बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या युवतीचा जीबीएस आजाराने मंगळवारी मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.*
*राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली आहे. नुकतंच या आजाराशी झुंज देणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या तरुणीचा जीबीएस सिंड्रोम आजाराने मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती.*
किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढू लागले आणि किरण राहत असलेल्या परिसरातही रुग्ण आढळले. दरम्यान किरणमध्येही ही लक्षणे जाणवू लागली. जुलाब व अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ञांना दाखवले. तेव्हा तज्ञांना तिच्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते.
[20/02, 10:57 am] +91 84463 72701: 🌍🔴सा. रत्नागिरी वैभव
*मुख्याध्यापकांचा वाढदिवस ‘वाचन प्रेरणा’ उपक्रमाने…*
*जि.प. पिरंदवणे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी राबवला कौतुकास्पद उपक्रम.*
संगमेश्वर —
तालुक्यातील जि. प. शाळा पिरंदवणे येथील उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करत विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावर्षी वाढदिवस रविवारी आल्याने त्यापुढील दिवसासाठी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी करून ठेवली होती.
दैनंदिन परिपाठ झाल्यानंतर शालेय मुख्यमंत्री कु. हार्दिक घेवडे याने प्रस्तावना करत ‘वाचन प्रेरणा’ उपक्रमाची माहिती दिली. “वाचन केल्याने मन सुसंस्कारित होते.
नवनवीन माहिती मिळते आणि त्यामुळे संतुलित मानसिक आरोग्य लाभते. आपण सर्वच मोबाईलमध्ये गुंतून पडल्याने वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आपण शालेय जीवनात अनेक समस्यांचा सामना करत आहोत.
सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी वाचन प्रेरणा सप्ताहामध्ये सहभागी होऊन आवांतर पुस्तके वाचूया. आणि आपल्या लाडक्या सरांना शुभेच्छा देऊया. हा सप्ताह बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी संपन्न होणार आहे.”
यावर मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण भावूक झाले. विद्यार्थ्यांनी अभिनव पद्धतीने दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार करताना ते म्हणाले, “आजपर्यंतचा हा सर्वोत्तम वाढदिवस आहे. पुस्तकांना दूर ठेऊ नका. त्यांच्याशी मैत्री करा. आपला आदर्श इतर ठिकाणी शोधण्यापेक्षा पुस्तकांत शोधा. ‘वाचन प्रेरणा’ संकल्प केवळ काही दिवसांपुरता मर्यादित राहू देऊ नका. ती सवय होऊ द्या. तुम्हा सर्वांनाचे मनःपूर्वक आभार आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गोड शुभेच्छा.”
▪️आज शिवजयंतीच्या दिवशी ‘वाचन प्रेरणा’ सप्ताहाची अधिकृत समाप्ती झाली.
मात्र हा उपक्रम पुढील काळात ‘१ तास वाचनासाठी’ या नावाने चालूच ठेवण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.