*कोकण Express*
*वीज वितरणच्या मनमानी विरोधात वैभववाडी भाजपा आक्रमक*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली वाढीव वीज बिले व वीज अधिकाऱ्यांनी सुरू केलेली वीज मीटर तोडण्याची मोहीम. या विरोधात जनतेत तीव्र असंतोष पसरला आहेत. कंपनीच्या अधिका-यांनी सुरू केलेल्या दादागिरी विरोधात वैभववाडी भाजपा आक्रमक झाली आहे. मनमानी व अनागोंदी कारभारविरोधात सोमवार दि. 15 मार्च रोजी जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन वैभववाडी वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता यांना भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.
वैभववाडी तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण झालेले धोकादायक पोल जैसे थे स्थितीत आहेत. बदलणे बाबत वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. मात्र वीज कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. 40 वर्षांपूर्वीचे ट्रान्सफारमर (रोहीत्र) बदलणे आवश्यक आहे. वीज वाहिन्या बदलण्यात याव्यात. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या आवारात वीजवाहिन्या आहेत. त्या धोकादायक आहेत. शाळेच्या आवारातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात. मंजूर शेती कनेक्शन अद्याप जोडलेली नाही. अशा मागण्या निवेदनात आहेत. वारंवार मागणी करूनही आपल्या स्तरावरून काही कारवाई झाली नाही. याविरोधात जनआंदोलन छेडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.