निवासी शिबिरातील संस्काराचा उपयोग समाजासाठी करा : श्री. चंद्रशेखर लिंग्रस

निवासी शिबिरातील संस्काराचा उपयोग समाजासाठी करा : श्री. चंद्रशेखर लिंग्रस

*कोंकण एक्सप्रेस*

*निवासी शिबिरातील संस्काराचा उपयोग समाजासाठी करा : श्री. चंद्रशेखर लिंग्रस*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराचा सांगता समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलताना ते म्हणाले की सह जीवन जगण्यात एक वेगळाच आनंद देऊन जातो. या काळात आपण अनेक माणसांना भेटतो, दत्तक खेड्यातील अपरिचित माणसं परिचित होऊन जातात. एक जिव्हाळा निर्माण होतो. शिबिरार्थींसाठी तर ती एक पर्वणीच असते. सहकाराची वृत्ती वाढते आणि एकोप्याची भावना निर्माण होते. त्यामुळे एक संस्कारक्षम पिढीची संकल्पना येथे साकारते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या संस्कार चा उपयोग समाजासाठी करा. अशा प्रकारची शिबिरे म्हणजे गांधीजींच्या विचारांची जडणघडण एनएसएसच्या उपक्रमातून होते असे लक्षात येते. जीवनानुभव देणारी ही सेवा असते व त्यातून आपल्या उज्वल परंपरेचे दर्शन आपण घडवत असतो. असे प्रतिपादन केले.

आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले की या दत्त खेड्यातील प्रत्येक व्यक्तीचे या शिबिराला सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कार्यक्रम पार पाडले.सात दिवसात अनेक उपक्रम पार पडले. बौद्धिक चर्चासत्र पार पडली. त्यांनी सातही दिवसाचा धावता आढावा घेतला.

त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरातील काही अनुभव व्यक्त करताना विद्यार्थ्यांची मनोगते झाली. त्यात काशी सावंत, रोहित वाघाटे, देवदीप परब, रितेश बावकर, ओमकार गुरव, प्रियांका मोंडकर, यांनी सहभाग घेतल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की शिबिरात अनेक गोष्टीत नवीन शिकवले जातात.अनेक बाबींचा विचार करता स्टेज डेरिंग हा गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावतो. ज्या विद्यार्थ्यांनी एन.एस.एस.ची प्रक्रिया पूर्ण करतात त्यांना त्याचा लाभ मिळतो. या शिबिराचा उपयोग आपल्या जीवनातला आकार देऊन जातो आणि आपण देशाचे जागरूक नागरिक बनतो. असे प्रतिपादन केले.

त्याप्रसंगी श्री. प्रकाश लिंगरस म्हणाले की विद्यार्थ्यांनी माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. अनेक उपक्रमांची चांगली पूर्तता केली. अनेक कामात साहचार्य दिसून आले. सरकारच्या माध्यमातून अनेक कामे होतात परंतु स्वच्छता ही आपणच केली पाहिजे. आणि ती विद्यार्थ्यांनी केली त्यामुळे मी समाधानी आहे. विद्यार्थ्यांची शिस्त प्रशंसनीय आहे. असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती पाटील यांनी केले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले. कार्यक्रमाला श्री शिवाजी लाड, श्री.सत्यवान लाड हे उपस्थित होते. त्याचबरोबर एन.एस.एस.चे सर्व स्वयंसेवक व सर्व महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!