*कोंकण एक्सप्रेस*
*नव नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत:सरपंच सौ.माधुरी चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे सारथीच्यावतीने युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत संगणकीय प्रशिक्षण दिले जात असून
मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी MKCL चे कट्टा येथील अधिकृत केंद्र ….स्मिता कम्प्युटर एज्युकेशनच्यावतीने मी लाभार्थी सारथी या संगणकीय डिप्लोमा कोर्स दशक्रोशितील विद्यार्थ्यांच्या साठी सुवर्ण संधी असून याचा लाभ घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन ग्रामसभेचे अध्यक्ष नांदोस गावच्या सरपंच सौ.माधुरी यशवंत चव्हाण मॅडम यांनी केले .
या वेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका श्रद्धा सुनील नाईक यांनी स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था द्वारे चालवले जाणारे विद्यार्थी कौशल्य उपक्रम तसेच सारथी डिप्लोमा कोर्स या विषय माहिती देताना कोर्स साठी लागणार कालावधी व कोर्स साठी लागणारी कागद पत्रे व विद्यार्थ्यांना होणारा आर्थिक फायदा या विषयी ग्रामसभेला उपस्थित परिसरातील समाजातील, ग्रामस्थ, पालक व सर्व जागरूक नागरिकांना मार्ग दर्शन केले तसेच या संधीचा आपण आपल्या परिसरातील युवकांना विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण ही युवकांना विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे व युवकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमावेळी सारथीचा कु. वेदांत महेश यादव याने आपल्याला या कोर्सचा कसा फायदा झाला या बद्दल विचार मांडताना विविध टूल्स चे उपयोग सांगितले.
या कार्यक्रमानिमित्ताने स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन च्या वतीने सदर डिप्लोमा पूर्ण झालेल्या वेदांत माधव,सानिका गावडे,प्राची गावडे यांची चार मॉडेल ची सर्टिफिकेट आणि डिप्लोमा चे अशी प्रमाणपत्र व दोन हजार अनामत रक्कम ग्राम सभेत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त उपसरपंच श्री.विजय निकम ग्रामपंचायत सदस्य ग्राम विस्तार अधिकारी श्री.प्रकाश सरमळकर तसेच महिला बचतगटा च्या पदाधिकारी, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका,शिक्षक-शिक्षिका, कृषी विस्तार अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, नांदोस परिसरातील ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

