कोकण एक्सप्रेस
दोडामार्ग फ्रिकवेन्सी स्कूल येथे छ. शिवाजी महाराज जयंती लक्षवेधी ..
दोडामार्ग – शुभम गवस
आज शिक्षण आणि संस्कार यांचा ताळमेळ महत्वाचा आहे. आपल्या मुलांना संस्कारमय शिक्षण द्यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिला पाहिजे. छत्रपतींच्या विचारातच खरे संस्कारमय शिक्षण आहे असे प्रतिपादन पत्रकार तेजस देसाई यांनी केले.
दोडामार्ग शहरातील फ्रिकवेन्सी स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती लक्षवेधी पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार श्री. देसाई यांच्या समवेत व्यासपीठावर भारतीय सैनिक राजेश गवस, विस्तार अधिकारी सुजित गायकवाड, मुख्याध्यापिका कीर्ती खोबरेकर, शिक्षिका रक्षता कुबल, शितल पटकारे, दीप्ती खरवत आदी उपस्थित होते. विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याने ऐतिहासिक वेशभूषा परिधान केली होती. तसेच किल्ले प्रतिकृतीही बनविल्या होत्या. श्री. देसाई पुढे म्हणाले, फ्रिकवेन्सी स्कूल हे केवळ शिक्षण देत नाही तर संस्कारमय शिक्षण देते हे अनेक उपक्रमातुन समोर येते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कोमल नाईक यांनी केले. यावेळी पालकही मोठया संख्येने उपस्थित होते.