*कोंकण एक्सप्रेस*
*किल्ले निवती स्वच्छता मोहीम फत्ते…*
*गडकिल्ले संवर्धन संस्थाच्या कोकण विभागाचा स्तुत्य उपक्रम*
*कासार्डे : संजय भोसले*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ‘स्वच्छ गड किल्ले,सुंदर गडकिल्ले’या संकलपनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने किल्ले निवती या किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम करण्यात आली. या मोहीमेची सुरवात महादरवाजा च्या परिसरात पासून करण्यात आली या मध्ये बुरूज, तटबंदी बाले किल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला.
छत्रपतींचे गड किल्ले हे मनाला शक्ती उर्जा देणाऱ्या वास्तू आहे. याचे जतन,संवर्धन संरक्षण झाले पाहिजे. ज्या मुळे पुढील येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजू शकेल. व या इतिहासामधून प्रेरणा भेटेल याच भावनेतून गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य महिन्यातून १ दिवस महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर जाऊन अशा विविध स्वच्छता मोहीमा राबण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे. या मोहीमेचे आयोजन अध्यक्ष-शूभम रानम, उपाध्यक्ष – शूभम फाटक,संपर्क प्रमुख-अभजित तिर्लोटकर,विकास तोरसकर, यांनी केले.
या मोहिमेमध्ये, राजेश काळे,सूरज राणम,चेतन गुरव, अनिरुद्ध तिर्लोटकर, प्रशांत गूरव,समीर गुरव,दुर्गेश गुरव, रोहित गुरव,सायली पांचाळ,सानिका रानम,अजय काळे, संदिप राणे,सोहम गूरव, निलेश साटम, अविनाश मोरे, विकास रानम,अजय काळे, प्रथमेश तांबे असे 25 दुर्ग सेवक दुर्ग सेविका उपस्थितीत होते. या मोहीमेला सरपंच तसेच कैलास सर व स्थानिक नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले.