*कोंकण एक्सप्रेस*
*ओसरगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी*
*भरगच्च कार्यक्रमांनी आणली अनोखी रंगत*
*कणकवली : प्रतिनिधी*
ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने कसाल पूला नजीक सर्वांच्या साक्षीने भव्य शिवजयंती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील लहान मुले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.लहान मुलांनी शिवकालीन वेशभूषा करून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली.

