*कोकण Express*
*मालवण पंचायत समितीमार्फत महिला दिन उत्साहात*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण पंचायत समितीच्या वतीने महिला दिन विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित खेळ पैठणीचा व वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांसाठी एक दिवस विनाकामकाजाचा या संकल्पनेखाली आयोजित कार्यक्रमात कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग व खेळ लक्षवेधी ठरले.
खेळ पैठणीचा स्पर्धेत ए. के. चव्हाण, मधुरा चोपडेकर, साक्षी सावंत यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. तर वेशभूषा स्पर्धेत युगंधरा तेंडुलकर, मेघा तळवडेकर, कौमुदी पराडकर, साक्षी सावंत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. विजेत्यांना सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ- पराडकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, सदस्य अशोक बागवे, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, मधुरा वराडकर यासह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने विधी सेवा समितीच्या वतीने ऍड. गावकर यांनी मार्गदर्शन केले. आहार तज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी आहार बाबत मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार मालवणकर यांनी महिलांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले. तर झुंबा नृत्य याबाबत मिनू देउलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.