कलमठ बाजारपेठ येथे विद्युतभार वाढल्याने ट्रान्सफॉर्मरला आग : ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक

कलमठ बाजारपेठ येथे विद्युतभार वाढल्याने ट्रान्सफॉर्मरला आग : ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठ बाजारपेठ येथे विद्युतभार वाढल्याने ट्रान्सफॉर्मरला आग : ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक*

*ग्रामस्थांच्या विद्युत उपकरणांचे नुकसान*

*महावितरण मुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी*

*कणकवली : प्रतिनिधी*

कलमठ बाजारपेठ मध्ये आज दुपारी ट्रान्सफॉरमरला अचानक लागलेल्या आगीमुळे विद्युतभार अचानक वाढून कलमठ बाजारपेठ मधील ग्रामस्थांच्या घरातील विद्युत उपकरणे टीव्ही,फॅन,सेट टॉप बॉक्स, ट्यूब लाइट,फ्रीज,बल्ब यांचे नुकसान झाले. महावितरणच्या
वाढत्या विद्युत भारामुळे झालेल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला मिळावा अशी मागणी कलमठ ग्रामस्थांनी सहाय्यक महावितरण अधिकारी कलमठ ग्रामीण 2, शाखा कणकवली विभाग यांच्याकडे केली.

महावितरण अधिकारी स्वतः कलमठ बाजारपेठ मध्ये ट्रान्सफॉरमर आणि नुकसान झालेल्या यंत्रणांची पाहणी केली.यावेळी युवासेना कलमठ शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, बाबू राऊळ,सुंदर कोर गावकर, ग्रामस्थ प्रदीप कांबळी,संदीप कांबळी,बाबू खामकर, बाबू कोरगावकर, अमोल कोरगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!