*कोकण Express*
*खारेपाटण हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विदयालय खारेपाटण व उद्योगपती प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम नुकताच कोविड १९ च्या नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक आकिवाटे, पर्यवेक्षक संजय सानप व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शाळेचे संस्थापक स्वातंत्र्यवीर गुरुवर्य शंकरराव पेंढारकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या शिक्षिका कोकाटे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले व स्त्री शिक्षणाचे महत्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनीकरिता शाळेचे क्रीडाशिक्षक पाडवी यांनी विविध मैदानी स्पर्धा घेतल्या. तर “गो गर्ल्स गो उपक्रमाअंतर्गत ४००, ८०० आणि ३००० मीटर धावण्याच्या स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच एरोबिक्स रिंग कवायत, संगीत खुर्ची व महिलांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी योगासने यावेळी घेण्यात आली.

