सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर*

*तालुकाध्यक्षपदी मकरंद सावंत तर सचिव पदी सुशील परब : खजिनदारपदी स्नेहल हजारे*

*कणकवली : प्रतिनिधी*

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका कार्यकारणीची सभा संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे पार पडली. जुन्या कार्यकारणीचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नूतन कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यानुसार तालुकाध्यक्षपदी मकरंद सावंत (शिवडाव) यांची निवड करण्यात आली तर कणकवली-वैभववाडी संघटकपदी अभिषेक नाडकर्णी, तालुका उपाध्यक्षपदी ऋषिकेश जाधव आणि रुजाय फर्नांडिस, सचिव सुशिल परब, सहसचिव यशवंत महाडिक, खजिनदार स्नेहल हजारे-कंचावडे, सहखजिनदार स्वप्निल पाताडे, सदस्य म्हणून अमोल भोगले, सुहासिनी कुलकर्णी, दुर्गाप्रसाद काजरेकर, निकेत पावसकर, देवेन सावंत, मिहीर तांबे, दिनेश अपराध, विनायक पारधिये, मंदार राणे, अजय आचरेकर यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, ह्यूमन राइट्सचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य कणकवली प्रतिनिधी अमेय मडव आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!