सावंतवाडी पं स सभापती मानसी धुरी यांचा राजीनामा

सावंतवाडी पं स सभापती मानसी धुरी यांचा राजीनामा

*कोकण Express*

*सावंतवाडी पं स सभापती मानसी धुरी यांचा राजीनामा*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील पंचायत समिती सभापती सौ.मानशी धुरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर याच्याकडे सुपूर्द केला. सर्वाना समान संधी या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांनी हा राजीनामा दिला आहे, आता त्याच्या जागी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

सावंतवाडी पंचायत समिती सभापती आरक्षण महिला ओपन असल्याने सभापती कोण याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान सभापती सौ.धुरी यानी राजीनामा दिल्याने प्रभारी कार्यभार उपसभापती शितल राऊळ पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!