हनुमंत गड फुकेरी येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम १९ फेब्रुवारीला

हनुमंत गड फुकेरी येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम १९ फेब्रुवारीला

*कोंकण एक्सप्रेस*

*हनुमंत गड फुकेरी येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम १९ फेब्रुवारीला*

*दोडामार्ग: शुभम गवस*

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग हिंदुस्थान आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ फुकेरी आयोजित हनुमंत गड फुकेरी येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम १९ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे तरी समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी ग्रामस्थ या सर्वांना आवाहन करण्यात येते की सढळ हस्ते तन मन धन स्वरूपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रम रूपरेषा पुढीलप्रमाणे –
१) स.६.०० वा. पूजन
२) स. १० ते दुपारी १ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आधारित रांगोळी स्पर्धा व वेषभूषा स्पर्धा
३) दुपारी १ ते २ वा. महाप्रसाद

*स्पर्धेसाठी अटी व नियम:*
*रांगोळी स्पर्धा;*
१)दिलेल्या जागेतच रांगोळी काढणे
२)वेळ दोन तासच असेल
३)प्रथम ३ पारितोषिके (शाल, प्रशस्ती पत्र)
४)सहभाग प्रशस्ती पत्र
५)वय मर्यादा – सर्वांसाठी

*वेषभूषा स्पर्धा:*
१)वेळ ५मिनिटे
२)वय : ८ ते १५ वर्षे
३)प्रथम ३ पारितोषिकं (शाल, प्रशस्ती पत्र)
४)सहभाग प्रशस्ती पत्र
५) वय मर्यादा- ५ ते १५ वर्षाचे स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात..

संपर्क:
निलेश आईर* ९४२११९४४३०
दिनेश सावंत* ९४०४७५९११०

आर्थिक सहकार्यासाठी संपर्क क्रमांक;
मेघनाथ (बंटी)आईर
७५०७४८११५१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!