*कोंकण एक्सप्रेस*
*धर्मवीर ग्रुप सिंधुदुर्ग महाराष्ट्र वतीने नागवे येथे सार्वजानिक शिवजयंती उत्सव*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कणकवली तालुक्यातील नागवे सांगवेकरवाडी येथे बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे सकाळी 10.00 श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा, दुपारी 3.00 ते 4.00 वाजता महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी 4.30 वाजता निबंध लेखन परीक्षा, रात्रीं 8.30 ते 9.30 वाजता ग्रामस्थांची स्थानिक भजने, 10.00 वा. रात्री संचालक सागर गवाणकर प्रस्तुत ॐ भवानी दशावतार नाट्य मंडळ राठिवडे तालुका मालवण आदी कार्यक्रम सादर होणार आहेत.
तरी आपण या प्रसंगी अगत्य येण्याची कृपा करावी व शिव प्रसादाचा लाभ घ्यावा. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मागणी धर्मवीर ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे.