*कोंकण एक्सप्रेस*
*जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा मराठा समाज रत्न पुरस्काराने गौरव*
*हिदू धर्मासाठी जगावे, एकत्र यावे स्वामीजींचे आवाहन*
*चिपळूण : प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदुधर्मासाठी जगावे व एकत्र यावे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे त्यांना मराठा समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल समोरील मैदानावर हा सोहळा झाला.
या सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने होते.यावेळी बोलताना जगद्गुरुश्री पुढे म्हणाले, ” हा पुरस्कार मी माझ्या विचारावर प्रेम करणाऱ्यांना समर्पित करतो.’ तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा ‘ या विचारांनी मी काम करतो.”त्यांनी आपल्या मनोगतामध्येछत्रपती शिवरायांची गुणवैशिष्टे सांगितली. संस्कार, स्वाभिमान,धैर्य, एकात्म भाव, संघटन कौशल्य आदी त्यांच्या गुणांचा गौरवाने उल्लेख केला.
कार्यक्रमाला आमदार. शेखर निकम, आमदार. भास्कर जाधव. आमदार किरण सामंत,माजी आमदार सदानंद चव्हाण.शिवव्याख्याते. नामदेवराव जाधव, दिलीप दादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी*मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार*मिळालेले असे – स्व .माजी खासदार गोविंदराव निकम, स्व. नाना जोशी. स्व.राजाराम शिंदे, स्व.बाळासाहेब माटे, स्व.केशवराव भोसले.यांना त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला त्यांच्या वतीने नातेवाईकांनी तो स्वीकारला.
*मराठा भूषण पुरस्कार* त्यामध्ये मराठा समाज-भूषण पुरस्काराने अनेकांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये दैनिक रत्नागिरी टाईम चे संपादक उल्हासराव घोसाळकर, गुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण सामंत,सदाशिवराव भोसले, प्रकाशजी देशमुख, कोकरे महाराज,विनोद चाळके,आशिफ बामणे..शौर्य पुरस्कार
योगिता खाडे..क्रिडा पुरस्कार हरिशदादा सावंत यांना क्रीडा क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला. यांच्यासह समाजासाठी कार्य करणाऱ्या बांधवांना पुरस्कार देण्यात आला.